शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पर्यावरणासाठी विजेची बचत करा

By admin | Published: March 26, 2017 1:40 AM

जगभरात वाढत असलेला विजेचा वापर आणि वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

अनिल सोले यांचे आवाहन : मनपा व ग्रीन व्हिजीलतर्फे ‘अर्थ अवर’नागपूर : जगभरात वाढत असलेला विजेचा वापर आणि वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यावर पर्याय म्हणून आॅस्ट्रेलियात १० वर्षांपासून ‘अर्थ अवर’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात भारतही सहभागी आहे. नागपूर शहरात महापालिका व ग्रीन व्हिजील संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा बचतीचा हा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण व वीज बचतीसाठी केवळ एक दिवस ऊर्जा बचत न करता आपल्या दैनंदिन जीवनात विजेची बचत करा, असे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी शनिवारी केले. सोले यांच्या नेतृत्वात शनिवारी रात्री सीताबर्डी येथील इंटर्निटी मॉलमध्ये एक तास वीज बचतीचा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. माजी महापौर प्रवीण दटके, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, मॉलचे महाप्रबंधक आशिष बारई व नगरसेविका उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते. एक युनिट वीज निर्माण करण्याकरिता ५०० ग्रॅम कोळसा तर ७.५ लिटर पाण्याची गरज भासते. याशिवाय यातून पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याला कारणीभूत असलेल्या कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन होते. एक तास वीजदिवे बंद ठेवल्यास मोठ्या प्रमाणात वीज बचत होईल, सोबतच पर्यावरण संवर्धनाला मदत होईल. मागील तीन वर्षांत नागपूर शहरात ९३ हजार ४८८ युनिट ऊर्जा बचत करण्यात आली. यातून देशाला एक संदेश दिल्याची माहिती सोले यांनी दिली. अनिल सोले यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे हा उपक्रम सुरू झाला. आजवर ३६ वेळा हा उपक्रम राबविण्यात आला. ३३ हजार घरापर्यंत वीज बचतीचा हा संदेश पोहोचला असून, पुढील वर्षात ५० हजार घरापर्यंत हा संदेश पोहोचविला जाईल, असा विश्वास प्रवीण दटके यांनी व्यक्त केला. कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरण रक्षणासाठी व प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेच्या सहकायांने हा उपक्रम नागपूर शहराच्या सर्व भागात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. इटर्निटी मॉलमध्ये ५० टक्के अनावश्यक दिवे बंद ठेवून ऊर्जा बचत करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागातील सहायक अभियंता अजय मानकर, सलीम इकबाल, एम.एम. बेडा तसेच कनिष्ठ अभियंता, ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक उपस्थित होते.(प्रतिनिधी)