लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.सीताबर्डी किल्ला नागपूरचे वैभव आहे. परंतु हा किल्ला खासगी हातात विकण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. यासाठीच येथील ११८ इन्फन्ट्री बटालियन येथून स्थानांतरित करण्यात आली आहे. हा किल्ला विकून याचा उपयोग पब, पार्टी, लॉन हॉटेल यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. ११८ बटालियन परत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी १८५७ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या धरणे आंदोलनात संयोजक अविनाश काकडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जनार्दन मून, सुनील चोखांद्रे, महेंद्र धावडे, सुभेदार सुखदेव गडपायले, तनवीर अहमद, विजय बारसे, अमिताभ पावडे, अॅड. नफीस खान, सय्यद जावेद, किशोर पलांदूरकर, सुभेदार कानेटकर, ताराचंद शर्मा, अशोक मोरे, मुरलीधर काकडे, शेखर काकडे, प्रेमकुमार बतरा, संतोष भुजाडे, सुभेदार कल्याण चोपडे, संदीप चिमूरकर, ओमप्रकाश काकडे, भारत ठाकरे, ममता तोमर, सुभेदार शेषराव मुरोडिया, राजू हिंगमिरे, प्रीती दहीकर, स्मिता सहारे, विजय पारधी, ज्योती गव्हाणे, पद्मा ठमके, नरेंद्र पलांदूरकर, प्रमोद पांडे, यशवंत तेलंग, अजय शेंडे, यशवंत डोंगरदिवे, हरमानचंद शेखावत, तुलसीदास डोईजड, पूनम रंगारी, गणेश मथुरे, आशिष उमरकर, सूरज करंडे, तुलसीराम गिरगुसे, प्रशांत बोरीकर, सुनील आष्टीकर, वीरेंद्र दहीकर आदींसह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:31 PM
११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देसंविधान चौक : धरणे आंदोलन