सावनेर/ कळमेश्वर/ कामठी/ काटोल/नरखेड/मौदा/कुही/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण अधिक आहे. शनिवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील १०८९ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण सावनेर, कळमेश्वर आणि कामठी तालुक्यातील आहे. सावनेर तालुक्यात ३०० रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ३० तर ग्रामीण भागातील २९५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील ४ रुग्ण पाटणसावंगी तर २ रुग्ण चिचोली आरोग्य केंद्राअंतर्गतची आहेत.
कळमेश्वर तालुक्यात १७३ रुग्णांची नोंद झाली. यातील ८४ रुग्ण कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील आहेत. ग्रामीण भागात गोंडखैरी (१६), मोहपा (१३), सवंद्री (१३), पिपळा (१०), तिष्टी (९), तेलगाव (८), तेलकामठी, म्हसेपठार, धापेवाडा येथे प्रत्येकी ६, लख्माखैरी (५), परसोडी, धूरखेडा येथे प्रत्येकी चार, तिडंगी, पानउबाळी, कोहळी येथे प्रत्येकी तीन, उबाळी, मांडवी, सोनुली येथे प्रत्येकी दोन तर घोराड, खुमारी, सुसुंद्री, पारडी, सोनपूर, बोरगाव खुर्द, आष्टीकला, कळंबी, सेलू, दहेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ५८५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ५२, डिगडोह (२६), इसासनी (९), हिंगणा (८), नीलडोह (७), मोंढा (५), कान्होलीबारा (४), मोहगाव ढोले व खिरोदा येथे प्रत्येकी ३, सावंगी देवळी, डेगमा, नागलवाडी येथे प्रत्येकी २, रायपूर, किन्ही, जुनेवानी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५५५० इतकी झाली आहे. यातील ४३०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रामटेक तालुक्यात आणखी ४४ रुग्णांची भर पडली आहे. यातील १२ रुग्ण शहरातील तर २९ ग्रामीण भागातील आहेत. शहरात आंबेडकर वॉर्ड येथे (५), टिळक वॉर्ड, रामालेश्वर वॉर्ड, गांधी वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, शिवाजी वॉर्ड, सुभाष वॉर्ड, स्वामी विवेकानंद वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात कामठी येथे (५), भिलेवाडा (४), परसोडा, नगरधन व मनसर येथे प्रत्येकी तीन, डोंगरी व वाहीटोला येथे प्रत्येकी दोन तर खंडाळा, मनसर माईन, पथरई, सराका, शिवणी, जिंजेरिया आणि पटगोवरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १६५५ इतकी झाली आहे. यातील ११७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत १०१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या केंद्राअंतर्गत आतापर्यंत १४७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १०१६ रुग्ण बरे झाले तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नरखेड तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यातील ४ रुग्ण शहरातील तर १८ ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१० तर शहरातील ८१ इतकी झाली आहे. शनिवारी जलालखेडा येथे १६ तर खंडाळा आणि सिंजर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मांढळ येथे (७), वेलतूर (४), कुही (३), तितूर (२) तर राजोली, बोडखी पेठ, सावंगी, आकोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९५९ इतकी झाली आहे. मौदा तालुक्यात २० रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ९७२ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ७७१ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काटोलचा धोका कायम
काटोल तालुक्यात ५७ रुग्णांची नोंद झाली. यातील ३९ रुग्ण शहरातील तर १८ ग्रामीण भागातील आहेत. काटोल शहरात पंचवटी येथे १०, जानकीनगर (४), सरस्वतीनगर, आयु.डी.पी (३), गळपुरा, लक्ष्मीनगर, वडपुरा, धंतोली येथे प्रत्येकी २ तर देशमुख ले-आउट, कुणबीपुरा, काळे चौक, खोजा ले-आऊट, शिंदे ले-आऊट, हत्तीखाना, पेठ बुधवार, होळी मैदान, पोलीस स्टेशन, शारदा चौक, भाटपुरा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये वंडली, मुकनी, सोनोली येथे प्रत्येकी २ तर पानवाडी, चिचाळा, खानगाव, जलालखेडा, चारगाव, डोंगरगाव, मसली, रिधोरा, कोंढाळी, मसाळा, येनवा, इसापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.