सावनेर तालुक्यात आतापर्यंत ३७९० रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव सावनेर शहरात आहे. येथे आतापर्यंत १८२१ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात ११४ गावांत कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेडसाठी तालुक्यातील रुग्णांची मारामार सुरू आहे.
मौदा तालुका
मौदा तालुक्यात आतापर्यंत २६७७ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक २८३ रुग्ण मौदा शहरात आढळून आले आहे. तालुक्यातील ६८ गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वेळेवर ऑक्सिजन बेड मिळाला नसल्याने तालुक्यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उमरेड तालुका
उमरेड तालुक्यात ३७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ७४२ रुग्ण उमरेड शहरातील आहे. तालुक्यातील ५८ गावांत कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चनोडा हे गाव सील करण्यात आले आहे. तालुक्यात आतापर्यंत ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भिवापूर तालुका
भिवापूर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा आहे. आतापर्यंत एकूण १,७६४ रुग्णांपैकी तब्बल ८४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २० रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सध्या भिवापूर शहरात असून, ही संख्या ४१० वर पोहोचली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात १,२४७ रुग्ण आहेत. मृतांची एकूण संख्या ४७ असून, यात शहरातील १२, ग्रामीण ३१ व तालुक्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात नांद, चिखलापार, बेसूर या आरोग्य सेवेचा अभाव आहे.
कळमेश्वर तालुका
कळमेश्वर तालुक्यात आतापर्यंत ५४६६ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक २५१२ रुग्ण कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात आढळून आले. तालुक्यात ७६ गावांत कोराेनाचे संक्रमण झाले आहे. आतापर्यंत ११९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.
नरखेड तालुका
नरखेड तालुक्यात आतापर्यंत ४०८३ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात १२१ पैकी १०० गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मन्नाथखेडी येथे सर्वाधिक १०५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जलालखेडा, मोवाड, भारसिंगी जामगाव (खु) सिंजर, मायवाडी, राणवाडी येथील रुग्णांना नागपूर, वरूड, अमरावती येथे ऑक्सिजन बेडसाठी भटकंती करावी लागली, तरीही ऑक्सिजन बेड मिळू शकले नाहीत.
हिंगणा तालुका
औद्योगिक वसाहत असलेल्या हिंगणा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यात आतापर्यंत ९६९७ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव वानाडोंगरी न.प. क्षेत्रात झाला आहे. येथे आतापर्यंत ६७९ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १५४ गावांत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.