लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकल विद्यालयाच्या शिक्षकांनी दुर्गम व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते सामाजिक दायित्व निभवताना सुधारणा घडवून आणत आहेत. खºया अर्थाने हे सेवाभावी शिक्षक राष्ट्रविकासाचे सारथी झाले आहेत, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, केशव मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा हिची विशेष उपस्थिती होती.एकल विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विकासाची कामेदेखील होत आहेत. येथील शिक्षकांच्या प्रयत्नातून ४५ गावे प्लास्टिकमुक्त झाली आहेत. आदिवासी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा असते. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा दाखविण्याची आवश्यकता असते. गडचिरोली जिल्ह्यात पाच वर्षांत पाच हजार कोटींचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. याशिवाय ‘आयटीसी’ या कंपनीने १० हजार आदिवासींना रोजगार मिळेल असा प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे.आदिवासी क्षेत्रात शिक्षणासोबतच रोजगारनिर्मिती तितकीच महत्त्वाची आहे, असे गडकरी म्हणाले. सर्वच्या सर्व एकल विद्यालय आता डिजिटल होणार असल्याची माहिती यावेळी गडकरी यांनी दिली. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, संस्थेचे सचिव प्रा.राजीव हडप, ट्रस्टी मोहन वºहाडपांडे, अरविंद शहापूरकर, बाळासाहेब अंजनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. अरुण लखानी यांनी प्रास्ताविक केले तर गजानन सिदाम यांनी एकल विद्यालयाबाबत माहिती दिली. प्रशांत बोपर्डीकर यांनी संचालन केले तर मोहन वºहाडपांडे यांनी आभार मानले. सीमा गायधने यांनी वैयक्तिक गीत सादर केले. प्रशिक्षण वर्गातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवदास भारसागळे, उषा ब्राम्हणकर, राजू जांभुळकर, गणेश चाफले, राजेश मडावी, राजेश उईके, दुर्योधन फुरसुंगे यांचा सत्कार करण्यात आला.गडकरी ‘रोडकरी’ नव्हे ‘शिक्षणकरी’यावेळी प्रीती झिंटा हिने आपले मनोगत व्यक्त केले. देव, पालक यांच्यानंतर आयुष्यात शिक्षकाचे मौलिक स्थान असते. मुलांना जसे शिक्षक शिकवितात, त्याप्रमाणे ते घडतात. त्यामुळे शिक्षकांवर मोठी जबाबदारी असते. आज महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. महिला सुरक्षेसाठी पुरुषांनीदेखील पुढाकार घ्यायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना सन्मान देण्याचे संस्कार शालेय जीवनापासूनच झाले पाहिजेत, असे प्रीती झिंटा म्हणाली. नितीन गडकरी यांची ओळख ‘रोडकरी’ अशी होती. आता मात्र ते मला ‘शिक्षणकरी’ वाटत आहेत, असे कौतुकोद्गारदेखील तिने काढले.
सेवाभावी शिक्षक हे राष्ट्रविकासाचे सारथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:08 AM
एकल विद्यालयाच्या शिक्षकांनी दुर्गम व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते सामाजिक दायित्व निभवताना सुधारणा घडवून आणत आहेत.
ठळक मुद्देनितीन गडकरी : एकलव्य एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप