लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : कॅन किंवा डबकीमध्ये पेट्रोल, डिझेल देऊ नका, असा लिखित आदेश सावरगाव पोलीस चौकीने पेट्रोलपंप चालकाला दिला होता. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यात येत होते. मात्र या आदेशामुळे शेतकºयांना फटका बसत आहे. याविरोधात नागरिकांनी शनिवारी (दि. २८) सावरगाव पोलीस चौकीला घेराव घातला. अखेर पोलीस निरीक्षकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले.पेट्रोलपंपावर कुणालाही कॅन अथवा डबकीमध्ये पेट्रोल, डिझेल देण्यात येऊ नये, असा आदेश पोलीस उपनिरीक्षक ताजणे यांनी पेट्रोलपंप संचालकाला लिखित स्वरुपात शुक्रवारी दिला. त्यानुसार पेट्रोलपंप संचालक आदेशाचे पालन करीत होता. परंतु या आदेशाचा फटका ट्रॅक्टर असलेल्या शेतकºयांसह पेट्रोलचे फवारणी संयंत्र असणाºयांना दुसºयाच दिवशी बसू लागला. शेतात मशागतीची कामे सुरू आहे. ओलितासाठी डिझेलपंप वापरले जातात. सोबतच फवारणीसाठी पेट्रोल फवारणी संयंत्रातही पेट्रोलची आवश्यकता असते. अशात ते पंप पेट्रोलपंपावर कसे आणावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला. यामुळेच शेतकºयांनी संतप्त होऊन सावरगाव पोलीस चौकीला घेराव घातला.कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल न देण्याच्या निर्णय हा चुकीचा आहे, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली. परंतु पोलीस काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अखेर नरखेडचे पोलीस निरीक्षक दिलीप मसराम हे तेथे आले आणि त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी पेट्रोलपंप व्यवस्थापकाला बोलावून शेतकरी व ट्रॅक्टर मालकांची गरज लक्षात घेता कॅनमध्ये पेट्रोल - डिझेल देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे प्रकरण शांत झाले.
सावरगाव पोलीस चौकीला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:35 AM
कॅन किंवा डबकीमध्ये पेट्रोल, डिझेल देऊ नका, असा लिखित आदेश सावरगाव पोलीस चौकीने पेट्रोलपंप चालकाला दिला होता. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यात येत होते.
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : कॅनमध्ये पेट्रोल न देण्याच्या निर्णयाचा विरोध