शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

म्हणे! ५०३८ खड्डे बुजवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 12:56 AM

खड्डे पडतात, ते बुजविलेही जातात. तरी रस्त्यावर खड्डे राहतातच. शहरात असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी ५०३८ खड्डे बुजविल्याचा दावा मनपाने केला आहे.

ठळक मुद्देतरी खड्डेच खड्डे चोहीकडे : पावसामुळे पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खड्डे पडतात, ते बुजविलेही जातात. तरी रस्त्यावर खड्डे राहतातच. शहरात असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी ५०३८ खड्डे बुजविल्याचा दावा मनपाने केला आहे. असे असतानाही जीवघेण्या खड्ड्यांची संख्या कमी का झाली नसावी असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. पावसामुळे तर त्यात खोलवर खड्ड्यांची भर पडली आहे. गिट्टी, डांबरही वाहून गेले आहे.नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित कामांतर्गत १ जानेवारी ते ३०ऑगस्ट या आठ महिन्याच्या काळात शहरातील ५०३८ खड्डे बुजवले आहेत. सुमारे ९४२४० वर्गफूट परिसर या माध्यमातून समतल करण्यात आला. हॉट मिक्स प्लँट विभाग, जेट पॅचर मशीन आणि इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे हे खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंगळवारी ही माहिती विभागामार्फत देण्यात आली. शहरात खड्ड्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लँट यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याची कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.हॉट मिक्स प्लँटच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्गमीटर क्षेत्र असलेले ३८७६ खड्डे बुजवण्यात आले. जेट पॅचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, मेकॅनिकल इंजिनियर योगेश लुंगे, उप अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते.झोननिहाय बुजवलेले खड्डेलक्ष्मीनगर - ५२३धरमपेठ - ३८५हनुमाननगर - ३८०धंतोली - २४८नेहरूनगर - ६८०गांधीबाग - ३३४सतरंजीपुरा - १३६लकडगंज - २३१आशीनगर- ३८४मंगळवारी - ५७५एकूण - ३८७६ खड्डे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका