शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपूरच्या पूनम अर्बन क्रेडिट सोसायटीत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:31 AM

पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेवीदारांचे लाखो रुपये हडपले. वारंवार मागणी करूनही आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सक्करदरा ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी हडपले लाखो रुपये : गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ : सक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेवीदारांचे लाखो रुपये हडपले. वारंवार मागणी करूनही आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सक्करदरा ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.पूनम अर्बनचे संचालक आणि अधिकारी ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या सोसायटीत रक्कम गुंतवण्यास भाग पाडत होते. हर्षवर्धन श्रावण झंजाळ (वय ५४) हे खरबी मार्गावरील शेषनगरात राहतात. त्यांनी सक्करदरा ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पूनम अर्बनचे संचालक आणि व्यवस्थापक यांनी त्यांना आमच्या सोसायटीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत भरपूर परतावा मिळतो, असे सांगून खाते उघडण्यास बाध्य केले होते. त्यामुळे झंजाळ यांनी १७ मार्च २०१८ ला खाते उघडून ४९,९९२ रुपये, त्यानंतर ५१,६९५ रुपये आणि नंतर १ लाख १,६८७ रुपयांची एफडी केली. २८ जून २०१९ ला मुदत संपल्यानंतर त्यांनी सोसायटीच्या संचालक आणि व्यवस्थापकांकडे रक्कम परत मागितली. मात्र, त्यांनी बरेच दिवस टाळाटाळ करून अलीकडे रक्कम परत करण्यास असमर्थता दर्शविली. झंजाळ यांच्यासारखेच अनेकांचे लाखो रुपये हडपून सोसायटीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे. त्यामुळे या सर्वांनीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने सोमवारी रात्री वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सक्करदरा पोलिसांनी पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, मंगळवारी रात्रीच्या पोलीस प्रेसनोटमध्ये आरोपींची नावे देण्याचे सक्करदरा पोलिसांनी टाळले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.तक्रारी करणाऱ्यांची नावेश्याम तेलंग : सात लाख रुपयेउज्ज्वला पाटील : साडेतीन लाख रुपयेज्ञानेश्वर केचे : ३ लाख ३० हजार रुपयेशिवानी चांदेकर : एक लाख ५ हजार रुपयेसंदीप केचे : तीन लाख रुपयेअंबादास तायडे : २ लाख ९५ हजार २९४ रुपयेशीतल काटेकर : १५ लाख २४ हजारकुबेर मिश्रा : चार लाख रुपये

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक