शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

पंचायत समितीची बनवाबनवी सुरूच

By admin | Published: July 29, 2014 12:48 AM

तालुक्यातील मेढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे स्थानिक सरपंचाने कुणाचीही परवानगी न घेता नामकरण केले. सदर प्रकार चव्हाट्यावर येताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

शाळा नामकरणप्रकरण : मेढा येथील प्रकारभिवापूर : तालुक्यातील मेढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे स्थानिक सरपंचाने कुणाचीही परवानगी न घेता नामकरण केले. सदर प्रकार चव्हाट्यावर येताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललित रामटेके यांनी दिले. मात्र, भिवापूर पंचायत समितीचे पदाधिकारी तथा संबंधित अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ देखावा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराला स्थानिक लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे. मेढा येथील सरपंच नारायण गोडे यांनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे नामकरण ‘स्व. केशवराव पांडुरंगजी गोडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेढा’ असे केले. यासाठी नारायण गोडे यांनी कुणाचाही परवानगी अथवा ग्रामपंचायत व स्थानिक शाळा व्यवस्थापनी समितीच्या सभेत साधा ठरावही पारित केला नाही. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली. या संदर्भात लोकमतमध्ये १५ व २१ जुलै रोजी वृत्तही प्रकाशित करण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही पंचायत समिती सभापती कुंदा कंगाले व गटशिक्षणाधिकारी डब्ल्यू. डी. कुमरे यांनी दिली होती. ही चौकशी सोमवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याला आठवडा लोटला असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही. पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने या प्रकरणाची चौकशी सोमवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, गटशिक्षणाधिकारी मंगळवारी (दि. २२) शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केवळ मुख्याध्यापकाकडून खुलासा मागितल्याचे कळवितात. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणे तर सोडा, साधी चौकशी करून सदर नाव मिटविण्याचे धाडस कुणीही करीत नाही. आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेता आपले मतदार नाराज होऊ नये, यासाठी केवळ चौकशीचा चोथा चघळणे सुरू आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यापालन अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)‘खुलासा’वर अडकली चौकशीया संदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र पाठविले. या पत्राची प्रतिलिपी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षालाही पाठविण्यात आली. ‘उच्च प्राथमिक शाळा मेढा येथे विस्तार अधिकारी प्रकाश लेदे यांनी भेट दिली. सदर शाळेवर नाव लिहिण्याबाबत या कार्यालयाची कुठलीही परवानगी घेतली नाही. याबाबत संबंधित मुख्याध्यापकास खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा प्राप्त होताच आपणास सादर करण्यात येईल’ असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सदर पत्र पंचायत समितीच्या लेटर पॅडवर न लिहिता साध्या कागदावर लिहिले असून, त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा शिक्का मारला नाही.