शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

रक्तगटाच्या प्लेटलेटस्चा तुटवडा

By admin | Published: November 11, 2014 1:02 AM

उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २५८ जणांना डेंग्यू झाला आहे. सद्यस्थितीत शासकीयसह अनेक खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णाने फुल्ल आहेत.

रुग्ण अडचणीत : रुग्णांची गरज ओळखून वाढतात किमतीनागपूर : उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २५८ जणांना डेंग्यू झाला आहे. सद्यस्थितीत शासकीयसह अनेक खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णाने फुल्ल आहेत. यात रक्तातील प्लेटलेटस् झपाट्याने कमी होतात. परिणामी प्लेटलेटस्च्या मागणीत वाढ झाली असून सर्वच रक्तपेढ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात याचा तुटवडा पडला आहे. विशेष म्हणजे तातडीच्या, मध्यरात्रीच्या किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेटस्ला काही रक्तपेढ्या मनमानेल किमती आकारत असल्याची माहिती आहे.हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेटस् हाही रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचे तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम या ‘प्लेटलेटस्’ नावाच्या पेशी करतात. या पेशी ‘प्लेट’प्रमाणे दिसतात. त्यामुळे ‘प्लेटलेटस्’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘थ्रोम्बोसाईट्स’ म्हणतात. डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेटस्ची संख्या अचानक कमी होऊ शकते. सध्याच्या स्थितीत महानगरपालिकेच्या आकडेवारीच्या चारपट रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण गंभीर स्वरुपाचे असल्याने डॉक्टर प्लेटलेटस्ची मागणी करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत दरदिवसाला विविध रक्त गटाच्या प्रत्येकी चार-पाच प्लेटलेटस्च्या पिशव्या तयार केल्या जातात. मात्र, अनेकवेळा याचा तुटवडा पडत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती खासगी रक्तपेढ्यांमधील आहे. डॉक्टरांच्या मते, रुग्णाला रक्तस्राव होत असेल आणि प्लेटलेटस्चे प्रमाण २० हजारापेक्षा खाली गेले असेल किंवा रक्तस्राव न होता दहा हजारापेक्षा कमी गेले असेल तेव्हाच प्लेटलेटस् लावले जाते. परंतु सद्यस्थितीत निगेटिव्ह रक्त गटाच्या प्लेटलेटस् मिळणे कठीण झाले आहे. यामुळे रुग्ण अडचणीत येत आहेत. रुग्णांची गरज ओळखून वाढतात किमतीकाही रक्तपेढ्या रुग्णांची गरज ओळखून प्लेटलेटस्च्या किमतीत चढ-उतार करीत असल्याची माहिती आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारीनुसार रात्री-बेरात्री, तातडीच्यावेळी किंवा दुर्मिळ रक्त गटाच्या प्लेटलेटस्ची मागणी केल्यास किमतीत वाढ होते. (प्रतिनिधी)