लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. भविष्यात ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्या.कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेड्ची संख्या वाढावी. या अनुषंगाने खासगी रुग्णालये आणि रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. या समितीने ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्याची बैठक बोलावली होती. समिती अध्यक्ष महापौर संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सह आयुक्त महेश गडेकर आदी उपस्थित होते.ऑक्सिजन निर्माते आणि पुरवठादारांनी आपल्या समस्या आणि अडचणी समितीपुढे मांडल्या. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा केला जातो. त्यामुळे इतरांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. सध्या कच्चा माल भिलाई येथून आणला जातो. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. अत्यावश्यक सेवेमुळे २४ तास सज्ज राहावे लागते. मजुरांचा खर्च वाढला आहे. त्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. या कारणामुळे सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी दर वाढवावा लागला असल्याचेही ऑक्सिजन निर्मात्यांनी सांगितले.सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आपला व्यवसाय असला तरी पूर्णपणे शक्य तसे सहकार्य करा, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले. पुरवठादारांनी सहकार्याचे आश्वासन समितीला दिले.
मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:42 PM
कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. भविष्यात ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्या.
ठळक मुद्दे उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची पुरवठादारांना सूचना