शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

शाळा-महाविद्यालयांनी सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यावा

By admin | Published: July 10, 2017 1:37 AM

समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे : राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. सौरऊर्जेचा नियमित व नियोजनबद्ध वापर सुरू झाल्यास ८० टक्के विजेची बचत होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३७ व्या अधिवेशनाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य संघटना व धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे महाविद्यालयाच्याच परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अरुण शेळके हे होते. याशिवाय उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर, ‘नॅक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष ब्रह्मभट, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्राचार्य डॉ. बबन तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात शाळा-महाविद्यालयांचे ‘डिजिटलायझेन’ होत आहे. मात्र भविष्यात विजेची आवश्यकतादेखील वाढणार आहे. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या संस्था सौरऊर्जा प्रकल्प उभारतील त्यांना शासन ५० टक्के अनुदान देईल, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले. उच्चशिक्षणाच्या विकासात प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. शिक्षण क्षेत्रासाठी शासनाने आर्थिक तरतूद वाढविण्याची गरज आहे. शिक्षणाचे खासगीकरण वेगाने होत असून हे भविष्यासाठी चांगले नाही. राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. सुभाष ब्रह्मभट म्हणाले. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा फटका देशाच्या विकासाच्या गतीला बसेल. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत कामा नये असे अ‍ॅड. शेळके म्हणाले. डॉ. तायवाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ. टाले यांनी आभार मानले. अधिवेशनात राज्यभरातील ४५० हून अधिक प्राचार्य सहभागी झाले आहेत.