शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शाळा कधी होणार स्मार्ट ?

By admin | Published: September 04, 2015 2:48 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे.

बसायला बेंच अन् शिकवायला शिक्षक नाही : शौचालयाचाही अभावनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे. कुठे विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाही तर कुठे शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे धक्कादायक वास्तव प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता निदर्शनास आले.संजयनगर येथील मनपाच्या हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली असता धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील शाहू हा विद्यार्थी मनपा शाळातून पहिला आला होता. परंतु येथील स्थिती थक्क करणारी आहे. शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन दोन महिने झाले. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप विज्ञान, गणित व इतिहास विषय शिकविले जात नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क-बेंच नसल्याने त्यांना चटई वा जमिनीवर बसावे लागते. शिक्षक आपल्या मर्जीनुसार शाळेत येतात व घरी जातात. त्यामुळे वर्गात शिकवले जात नाही. यासंदर्भात तक्रार केली तर शाळाप्रमुखांकडून विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली जाते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. शिक्षकांची मनमानी व सुविधांचा अभाव याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. तसेच चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी विद्यार्थ्यांना दमदाटी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. शौचालयाची दुरवस्था असून येथे याचा वापर करता येत नाही. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग होत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी रामभरोसे असल्याचे चित्र आहे. या शाळेतील विद्यार्थी शाहू याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून मनपा शाळेत पहिला आला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाचे या शाळेकडे लक्ष जाईल व सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. येथील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, मनपाच्या शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संजयनगर शाळेला भेट दिली असता येथे अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांची मनमानी, वर्गखोल्यांची दुर्दशा, अस्वच्छता, वर्गात शिकविले जात नसल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या. याबाबतचा अहवाल समितीने महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोपविला आहे. अहवालामुळे आयुक्त संबंधित शिक्षकांवर कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)विभागप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हसंजयनगर शाळेतील अनियमिततेसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशावरून पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. विभागप्रमुख अशोक टालाटुले या समितीचे प्रमुख आहेत. परंतु शिक्षण समितीच्या काही सदस्यांनी यापूर्वीच टालाटुले यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली होती. टालाटुले यांच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. असे असतानाही चौकशीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे चुकीचे असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. निलंबन कारवाई होण्याची शक्यतासंजयनगर शाळेच्या मुख्याध्यापक ांच्या विरोधातील तक्रारी व अनियमितता यासंदर्भात शिक्षक संघटनांनी अनेक तक्र ारी केल्या आहेत. शिक्षण समितीनेही पाहणी केली तसेच चौकशी समितीने आयुक्तांना अहवाल दिला. अहवालामुळे काही शिक्षकांवर निलंबन कारवाई होणार असल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे.