शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

नागपुरात शाळेचे विद्यार्थी डेंग्यूच्या सावटाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 9:36 PM

नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

ठळक मुद्दे२९ शाळांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या : ९४ दूषित घरांंवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या तपासणीत २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने शाळांना स्वच्छता पाळण्याचे पत्र दिले आहे. अशा दूषित शाळा व घरांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपाच्या उपद्रव शोध पथकालाही देण्यात आला आहे.नागपूर शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन मृत्यू होते. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये २०० तर गेल्या वर्षी, २०१८ मध्ये ५४३ रुग्ण आढळून आले. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ६९ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे पंधरा वर्षाखालील मुले-मुली आहे. याला गंभीरतेने घेत हिवताप व हत्तीपाय रोग विभागाने शाळा सुरू झाल्यापासून शाळांची तपासणी मोहीम हाती घेतली. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात २९ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही कूलर्स, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृह, कुंड्या, ड्रममधून होत असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शाळेतील प्राचार्य, शिक्षक किंवा जबाबदार अधिकाऱ्यांना अळ्या दाखविल्या. त्यांच्यासमक्ष पाण्याची विल्हेवाट लावून कीटकनाशक फवारणी केली. सोबतच स्वच्छता पाळण्याचे पत्रही दिले. या शिवाय, डेंग्यू अळ्या शोध मोहीम घराघरांतही सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात ९४ घरे दूषित आढळून आलीत.दंडात्मक कारवाईसाठी प्रस्तावडेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. डेंग्यूला कारणीभूत असलेला ‘एडीस’ डास हा कूलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहिल अशा ठिकाणी हा लवकर फैलतो. यामुळे पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. परंतु काही शाळा व घरमालक याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागते. यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडे पाठविण्यात आला आहे.जयश्री थोटेअधिकारी, हिवताप व हत्तीपाय रोग विभाग, मनपा

टॅग्स :dengueडेंग्यूStudentविद्यार्थीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका