शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्कूल व्हॅन उलटली

By admin | Published: August 13, 2015 3:30 AM

अजनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर टायर पंक्चर झाल्यामुळे एक स्कूल बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

नागपूर : अजनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर टायर पंक्चर झाल्यामुळे एक स्कूल बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. घटनेत पाच विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली. तर ८ ते १० विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. बुधवारी सकाळी झालेल्या या गंभीर घटनेत त्वरित मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संजय बोटरे ही स्कूल व्हॅन चालवित होता. तो रामदासपेठच्या सोमलवार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो. बुधवारी सकाळी रामेश्वरी ते अजनी पुलाकडे तो जात होता. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मतानुसार डीसीपी झोन ४ च्या कार्यालयाजवळ अचानक चालकाच्या सीटजवळील टायर पंक्चर झाला. यामुळे व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटला आणि रस्ता दुभाजकावर आदळून व्हॅन उलटली. अचानक झालेल्या या अपघातामुळे व्हॅनमधील विद्यार्थी घाबरले आणि ते आरडाओरड करीत होते. डीसीपी कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी दरवाजा आणि काच फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. व्हॅनचा चालक संजय बोटरे हा सुद्धा या अपघातात जखमी झाला. नागरिकांनी व्हॅनमधील विद्यार्थ्यांना त्वरित मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. समीक्षा भगवान गणवीर (१२), श्रेया पाठक (७), आंचल लक्ष्मण सोमकुवर (१५) आणि इतर दोन विद्यार्थ्यांना डोक्यावर जखम झाली. त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. अजनी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. एका महिन्यात स्कूल व्हॅनचा अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. ७ जुलैला खरबी येथे अनियंत्रित झालेली स्कूल व्हॅन उलटल्यामुळे विद्यार्थी जखमी झाले होते. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी शाळेच्या वाहनांची तपासणी होत असूनही अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)