शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरात शाळा झाल्या सुरू, विद्यार्थ्यांना मात्र सुटी, शिक्षकांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 9:34 PM

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.

ठळक मुद्देशाळा व्यवस्थापन समितीच्या झाल्या बैठकी : १२३५ शाळांचा बैठकीचा अहवाल पोहचला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.

कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत राज्यातील सर्व शाळांना १६ मार्च पासून सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पुढे या सर्व शाळा सत्र संपतपर्यंत बंदच होत्या. नवीन शैक्षणिक सत्रात शाळा कधी व कशा सुरू करायच्या याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून १५ जून रोजी एक परिपत्रक निर्गमित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ९, १० आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, ६ ते ८ चे वर्ग १ आॅगस्ट, तिसरी ते पाचवीचे वर्ग १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावे. तर वर्ग १ व २ शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात यावे. कन्टेन्मेंट एरियामधील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे सुचविले होते. पण शिक्षकांनी उपस्थित रहावे किंवा नाही, याबाबत स्पष्ट केले नव्हते. मात्र स्थानिक प्रशासनाने पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीसुद्धा घेण्यास सांगितले होते. शिक्षकांनी शाळेत जातांना आरोग्याची तपासणी सुद्धा करवून घ्यायची होती. काही शाळेत याचे पालन झाले तर काही शाळेत याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील कन्टेन्मेंट एरिया सोडून सर्वच शाळा सुरू झाल्या. शिक्षण विभागाकडे शाळेच्या पहिल्या दिवशीचा १२३५ शाळांनी अहवाल पाठविला. दरम्यान कमी पटसंख्येच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले.आरोग्य तपासणी न करताच शिक्षक शाळेतबाहेरगावाहून येणाºया शिक्षकांनी वैद्यकीय तपासणीची प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आदेश होते. त्यासाठी काही शिक्षकांनी सकाळपासून आरोग्य केंद्रामध्ये गर्दी केली होती. काही शिक्षक शाळेत पोहचल्यानंतर, आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले. बहुतांश शिक्षक आरोग्य तपासणी न करताच शाळेत पोहचले.वेलतूर ग्रा.पं.ने दिला इशाराकुही पं.स. अंतर्गत येणाऱ्या वेलतूर ग्रा.पं.ने जि.प. उच्च प्रा. शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठवून शिक्षकांना मुख्यालयीच राहण्याची स्पष्ट ताकीद दिली. अन्यथा मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करून गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले. पचखेडी ग्रा.पं.ने शिक्षकांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात ठेवून, त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुम शोधून देणार असा निर्णय घेतला.मुंबई, ठाण्यातील शिक्षकांना दिलासा आम्हाला का नाही?शालेय शिक्षण विभागाने २४ जून रोजी परिपत्रक काढून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथील शाळेच्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार व ५५ वर्षावरील शिक्षकांना शाळेत न बोलाविण्याच्या सूचना केल्या. असा दिलासा इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही द्यावा, अशीही मागणी शिक्षकांनी केली.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर