लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील धम्मदीप वाघमारे व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील नितीन ढोरे यांनी ही कमाल केली आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे जगात सर्वात जास्त समस्या निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात ठेवून या दोघांनीही विघटनशील प्लास्टिक कसे तयार होईल, यासंदर्भात विविध प्रयोग सुरू केले. धम्मदीपने तर बीएस्सीला असल्यापासूनच यासंदर्भात सखोल वाचन केले. ग्लिसरीन, स्टार्च पावडर व विनेगर या खाद्यपदार्थात वापर होणाऱ्या घटकांचा त्यांनी उपयोग केला. या मिश्रणाला त्यांनी अगोदर विशिष्ट तापमानावर गरम केले व त्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून प्लास्टिकसारखा पदार्थ तयार झाला. सुरुवातीला हे प्लास्टिक लगेच तुटत होते. मग वेगवेगळे ‘कम्पोनन्ट्स’ वापरल्यानंतर जैव प्लास्टिक तयार झाले. हे प्लास्टिक जमिनीत टाकल्यानंतर दीड महिन्याच्या आत विघटित होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.या दोघांनीही त्यांचा हा प्रयोग रसायनशास्त्रातील विविध तज्ज्ञांना दाखविला. तसेच विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये ते सहभागी झाले. विद्यापीठ पातळीवर दोघांनाही पुरस्कार मिळाला व त्यांना राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केले.आणखी सुधारणेची आवश्यकतानवोदय विद्यालयात बारावीला असल्यापासूनच आम्ही दोघांनी या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली होती. आम्ही सुरुवातीला अनेकदा अपयशाचा सामना केला. जैव प्लास्टिकचा दर्जा वाढावा यासाठी रबराच्या झाडासारख्या विविध घटकांचा उपयोग करून पाहिला. आम्ही जे जैव प्लास्टिक तयार केले आहे त्यातून प्लेट, कप, पिशवी बनू शकते. मात्र या गोष्टी जास्त वजन उचलू शकत नाही. जैव प्लास्टिकला मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन प्रयोग करीत असल्याची माहिती धम्मदीप वाघमारेने दिली.
विज्ञान दिवस : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले जैव प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:11 AM
मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.
ठळक मुद्देविघटन करणे शक्य : पर्यावरण संवर्धनासाठी ठरू शकते फायदेशीर