पूर्वी जुनी पुस्तके वापरण्याची पद्धत होती. एकावर्षी गणवेश खरेदी केला, तो चार वर्ष चालायचा. हा प्रकार आता बंद झाला आहे. शाळा सुरू होताना नवीन गणवेश, नवीन दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स सर्व नवीन साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे जून महिन्यात पालकांना शालेय साहित्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागते. शाळेंचे स्टॅण्डर्ड वाढल्यामुळे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पालकांना हा खटाटोप करावाच लागतो. याचा फायदा शालेय साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी घेतला आहे. नामांकित कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहे. या कंपन्या दरवर्षी शालेय साहित्याच्या किंमती वाढवीत आहे. विद्यार्थी आणि शाळेच्या दबावात पालकांनाही नाईलाजास्तव खरेदी करावे लागत आहे. शहरातील महाल, सीताबर्डी, गांधीबाग या बाजारपेठांमधील शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये ड्रेस, दप्तर, वह्या, रेनकोट, छत्र्या खरेदी करण्यासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. शहरात एकाच महिन्यात १० कोटीच्या वर शालेय साहित्याची खरेदी विक्री होत असल्याचा अंदाज आहे. शाळा व्यवसायात उतरल्याने, विक्रेत्यांना फटकाबहुतांश शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱ्यांची गोची झाली आहे. शाळेच्या तुलनेत रिटेल बाजारात शालेय साहित्याच्या किमती कमी आहे. मात्र शाळांकडून पालकांना खरेदीचा तगादा लावला जात असल्याने बाजारात पुस्तके आणि वह्यांची विक्री मंदावली आहे. हरीश राठी, पुस्तक विक्रेता
खिशाला कात्री !
By admin | Published: June 18, 2015 2:17 AM