लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षी ‘स्क्रब टायफस’च्या आजाराने २९ रुग्णांचे बळी घेतले होते, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाला सुरुवात होत नाही तोच तीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागानुसार, रुग्णामध्ये मानेवाडा भागातील एक युवक, नवी इतवारी भागातील एक मुलगी व काचीपुरा परिसरातील चारवर्षीय मुलाचा समावेश आहे.‘ट्रॉम्बिक्युलीड माईट्स’चे लारव्हे; ज्याला ‘चिगर माईट्स’ म्हणतात त्याच्यातील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका होतो. स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. योग्य उपचार मिळाले नाही तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यूही होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात १५५ रुग्णांची नोंद झाली होती, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची (एनआयसीडी) चमू आली होती. त्यांच्या मदतीला पुण्याच्या सहसंचालक आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ चमू होती. शिवाय, रुग्ण आढळून येणाऱ्या भागातील उंदीर पकडण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले होते. पकडलेल्या उंदरांच्या अंगावरील ‘चिगर माईट्स’ काढून अभ्यासही केला होता. परंतु पावसाळा संपताच या आजाराचे रुग्ण कमी झाल्याने नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढताच पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत. हिवताप व हत्तीरोग विभागाच्या जयश्री थोटे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्क्रब टायफसचे तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’कडे (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.या भागातील आहेत रुग्णस्क्रब टायफसचे आढळून आलेला रुग्णामध्ये एक युवक रुग्ण मानेवाडा भागातील, नवी इतवारी भागातील एक मुलगी तर चार वर्षीय मुलगा हा काचीपुरा परिसरातील आहे.
परत येतोय स्क्रब टायफस : नागपुरात तीन रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:48 AM
गेल्या वर्षी ‘स्क्रब टायफस’च्या आजाराने २९ रुग्णांचे बळी घेतले होते, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाला सुरुवात होत नाही तोच तीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागानुसार, रुग्णामध्ये मानेवाडा भागातील एक युवक, नवी इतवारी भागातील एक मुलगी व काचीपुरा परिसरातील चारवर्षीय मुलाचा समावेश आहे.
ठळक मुद्देगेल्यावर्षी २९ रुग्णांचा घेतला होता बळी