लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या ९९वर पोहचली आहे. यात एकट्या नागपूर ग्रामीणमधील ३० तर शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. पोळ्याच्या दिवशी चार रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यातील दोन रुग्ण हे नागपूर शहरातील आहे. विशेष म्हणजे, रुग्णाची माहिती, त्याचा पत्ता योग्य पद्धतीने भरले जात नसल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला रुग्णाच्या घरी व परिसरात उपाययोजना करण्यास अडचणीचे जात असल्याची माहिती आहे.‘स्क्रब टायफस’चे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागासोबतच मेडिकल, मेयो प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. सध्या या दोन्ही रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयात ७० रुग्ण उपचार घेत आहेत. यात ३९ पुरुष तर ३१ महिला आहेत. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात १०वर रुग्ण तर बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात सहा चिमुकले उपचार घेत आहेत. सोमवारी पुन्हा चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात यवतमाळ, भंडाऱ्यातील एक-एक रुग्ण असून नागपूर शहरातील दोन रुग्ण आहे. या रोगाचे आतापर्यंत ९९ रुग्ण आढळून आले आहेत. यात भंडारा पाच, गोंदिया तीन, चंद्रपूर एक, गडचिरोली चार, नागपूर ग्रामीण ३०, शहर १८, वर्धा सहा, अमरावती नऊ, अकोला दोन, यवतमाळ एक, मध्यप्रदेश १९ तर आंध्रप्रदेशातील एक रुग्ण आहे.शहरात आढळून येणारे स्क्रब टायफसचे रुग्ण एकाच वसाहतीतील नाहीत. यातही एका घरातून एकच रुग्ण दिसून येत आहे. यामुळे या रोगाचे मूळ कुठे आहे, याचा शोध घेणाऱ्या महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला अडचणीचे जात आहे. या शिवाय, नेमका पत्ता उपलब्ध नसल्याने घर शोधण्यातच बराच वेळ जात असल्याचे एका अधिकाºयाने नाव न लिहीण्याच्या अटीवर सांगितले.
नागपूर शहरात वाढतोय स्क्रब टायफस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:31 AM
विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या ९९वर पोहचली आहे. यात एकट्या नागपूर ग्रामीणमधील ३० तर शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. पोळ्याच्या दिवशी चार रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यातील दोन रुग्ण हे नागपूर शहरातील आहे. विशेष म्हणजे, रुग्णाची माहिती, त्याचा पत्ता योग्य पद्धतीने भरले जात नसल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला रुग्णाच्या घरी व परिसरात उपाययोजना करण्यास अडचणीचे जात असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देरुग्णांची संख्या पोहचली ९९वर : पोळ्याच्या दिवशी चार रुग्णांची पडली भर