लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण व एक वर्धेचा रुग्ण आहे. स्क्रब टायफसची ही शतकाकडे वाटचाल धोक्याची सूचना असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.स्क्रब टायफसची लक्षणे असो वा नसो, ताप असलेल्या रुग्णांना ‘डॉक्सीसायक्लीन’ औषध देण्याचा सूचना आरोग्य विभागाने दिल्याने गेल्या काही दिवसांत गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात सहा वर्षीय मुलगी कारंजा नागपूर येथील आहे. उर्वरीत ५० वर्षीय पुरुष हा दिघोरी नागपूर येथील, ३१ वर्षीय तरुण हा पारडी नागपूर येथील, २९ वर्षीय तरुण मानेवाडा नागपूर येथील तर ४० वर्षीय महिला वर्धा येथील आहे.६८ रुग्णांवर उपचारस्क्रब टायफसचे आतापर्यंत नोंद झालेल्या ९३ रुग्णांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६८ रुग्ण अद्यापही उपचाराखाली आहे. उर्वरित १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.शहरात रुग्णांची संख्या १६शनिवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील तीन तर एक ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत शहरात १६ रुग्ण तर ग्रामीणमध्ये ३० रुग्ण आढळून आले आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्ण एकट्या नागपूर जिल्ह्यात म्हणजे ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूचा आकडा नऊवर पोहचला आहे.
‘स्क्रब टायफस’ची रुग्णसंख्या ९३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:03 AM
स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण व एक वर्धेचा रुग्ण आहे. स्क्रब टायफसची ही शतकाकडे वाटचाल धोक्याची सूचना असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
ठळक मुद्दे१५ बळी : सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच जण पॉझिटीव्ह