शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

स्क्रब टायफसने घेतला बाळंतणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:10 PM

‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेडिकल : मृत्यूची संख्या झाली ६

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे.‘स्क्रब टायफस’ आजाराचे नागपूर जिल्ह्यात रुग्ण दिसून येऊ लागल्याने व मृतांचा आकडा वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. मेडिकलमध्ये गेल्या २६ दिवसांमध्ये १३ रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांमध्ये तिर्थकुमार धनवानी (५८) रा. जरीपटका, नागपूर , कुसूम खराडे (५४) रा. पारडसिंगा, काटोल, त्रिवेनी गौतम (१७) रा.बालाघाट, मध्यप्रदेश, संजय रणदिवे (३८) रा. महाल, नागपूर व गंगाबाई इरपाचे (५५) रा. नगरखेड आदींचा समावेश आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या बाळंतणीची माहिती वरीष्ठ डॉक्टरांकडे उपलब्ध नव्हती. परंतु आरोग्य विभागाने घेतलेल्या या बैठकीत या मृत्यूची माहिती देण्यात आल्याचे समजते.सुत्रानूसार, मृत महिलेने काही दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला ‘स्क्रब टायफस’ रोग झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. सध्या मेडिकलमध्ये नरखेड, अमरावती, कोंढाळी, डोंगरगाव, कामठी, मध्यप्रदेशातील बैतुल व सिवनी येथील रुग्ण उपचार घेत आहेत. यातील दोन रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयDeathमृत्यू