नागपूर : मध्यमवर्गीयांना कोणताही थेट फायदा न देता सेवाकर १२.३६ वरून १४ टक्क्यांवर नेण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असून घरे व औषधांपासून सर्व प्रकारची महागाई वाढणार आहे. आधीच कराचा भार सोसणाऱ्या नागपूरकरांनी सेवाकरांच्या वाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक सेवा कराच्या टप्प्यात आल्याने जीवनशैली महागडी होणार आहे. त्यात गरीब व सामान्य भरडला जात आहे. ११८ सेवांवर करदोन ते चार सेवांनी सुरू झालेला सेवाकर आता जवळपास ११८ सेवांवर आकारला जातो. देशातील प्रत्येक सेवा कराच्या टप्प्यात आली आहे. मोबाईलचे रिचार्ज असो वा हॉटेलचे बिल सर्व काही या टप्प्यात आहे. प्रत्येक क्षणी नागरिक कर देतो. १ एप्रिलपासून १४ टक्के करआकारणी होणार आहे. मोबाईल रिचार्ज, के्रडिट कार्ड, डेबिट कार्ड. फॅशन डिझायनर्स, इंटेरिअर डेकोरेटर, हेल्थ क्लब, फिटनेस सेंट, हॉटेल, क्लब हाऊस, गेस्ट हाउस, रेस्टॉरेंट सेवा, ट्रॅव्हल्स एजंट, केबल आॅपरेटर्स, सौंदर्य सेवा, कॅटरिंग, फोटोग्रॉफी, टूर आॅपरेटर, कॅब, रेल्वे ट्रॅव्हल्स एजंट सर्वकाही महाग होणार आहे. हे सर्व करीत असताना अॅम्ब्युलन्स सेवांना वगळले आहे. आता म्युझियम, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंक्चुरी, टायगर रिझर्व्ह आदींमध्ये प्रवेश आदींना सेवेतून वगळले आहे. फळ-भाज्यांची प्री-कोल्ड स्टोरेज सेवा, निर्यातीसाठी रस्ता मार्गाने कस्टम स्टेशनपर्यंत मालाचे परिवहन, सीईटीपी आॅपरेटर, एलआयसी वरिष्ठ पेन्शन विमा योजनेसंबंधी सेवांना कर लागणार नाही. पेट्रोल-डिझेल दरवाढीने महागाई वाढणारमहागाईने आधीच बेजार असलेल्या नागपूरकरांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार नागपुरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वधारून अनुक्रमे ६९.७९ आणि डिझेल ५८.५९ रुपयांवर पोहोचले आहेत. याआधी रेल्वे बजेटमध्येही सिमेंट, कोळसा, धान्य, डाळ, युरिया, खाद्य तेल, एलपीजी, केरोसिन आदींच्या वाहतुकीत वाढ झाली आहे.
सामान्यांच्या खिशाला कात्री
By admin | Published: March 01, 2015 2:21 AM