एसडीआरएफला ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच समादेशक पंकज डहाने आणि सहायक समादेशक प्रमाेद लाेखंडे यांच्या मार्गदर्शनात पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. येथे टीम कमांडर आर. एन. मडावी, पीएसआय एस. एस. जंबिली व पीएसआय आर. एल. माेरला यांच्या नेतृत्वात पथकाने नदीतील मृतदेह शाेधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दाेन दिवस शाेधमाेहिम राबविल्यानंतर डीडीआरएफ, अमरावतीच्या पथकाच्या सहकार्याने गुरुवारी यश मिळाले. या संयुक्त कारवाईत सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सात मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक पाेलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. शाेधमाेहिम अद्याप संपलेली नसून एका लहान मुलीचा मृतदेह शाेधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशा कठीण प्रसंगी एसडीआरएफ पथकाद्वारे सुरू असलेले सेवाकार्य उल्लेखनीयच म्हणावे लागेल.
बुडालेल्यांना काढण्यात एसडीआरएफने शर्थ लढविली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:12 AM