लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. तर गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील तकिया, दिवानशहा मोमिनपुरा येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्यात आले.प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.नारायणपेठ, प्रेमनगर प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपूर्वेस -तुमसरे यांंचे घरउत्तरपश्चिमेस - ठाकरे यांचे घरदक्षिणपश्चिमेस- संजय वर्मा यांचे घरदक्षिणपूर्वेस-नीलेश पानमंदिरमॉडेल टाऊन इंदोरा प्रतिबंधित क्षेत्रपश्चिमेस - भाऊराव रंगारी यांचे घरउत्तरेस -उदय बिल्डिंग, जी.के. चव्हाण यांचे घरउत्तरपूर्वेस -विकास रंगारी यांचे घरदक्षिणपूर्वेस-रूपकुमार साखरे यांचे घरतकिया दिवानशहा मोमीनपुरा कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिमेस -मोतीबाग रेल्वे ब्रीजउत्तरपूर्वेस -पाचपावली रेल्वे ब्रीजपूर्वेस -गोळीबार चौकपूर्वेस -तीन खंबा चौकदक्षिणपूर्वेस -नालसाहेब चौकदक्षिणपूर्वेस -गांजाखेत चौकदक्षिणपूर्वेस -अग्रसेन चौकदक्षिणेस -गीतांजली चौकदक्षिणेस-अजंता टी स्टॉलदक्षिणपश्चिमेस -मेयो कंपाऊंड वॉलपश्चिमेस-गरीब नवाज मशीद
नागपुरातील नारायणपेठ, प्रेमनगर, मॉडेल टाऊन इंदोरा परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:28 PM
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
ठळक मुद्देतकिया, दिवानशहा मोमिनपुरा प्रतिबंधित क्षेत्र कमी केले