लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शबरी माता नगर, गोरेवाडा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश बुधवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
नागपुरातील शबरी मातानगर गोरेवाडा परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:03 AM
महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शबरी माता नगर, गोरेवाडा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश बुधवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश