लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा ऐतिहासिक वारसा प्रशासनाच्या नजरेतून धूसर होत असल्याने, त्या वास्तू ओस पडलेल्या आहेत. महाल परिसरात अशा अनेक वास्तूंची दुरवस्था बघायला मिळते. समाज आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पुरातन वास्तूकलेचा नमुना असलेल्या या हेरिटेज वास्तू नष्ट होऊन टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. शहराचे हे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे अवलोकन केले.आजच्या तरुणाईला इतिहासाचे किती आकर्षण आहे, हे बघण्यासाठी ‘द गुडविल ट्राईब’ या संस्थेने हेरिटेज वॉकसाठी इंटरनेटवरून आवाहन केले होते. त्यासाठी आॅनलाईन फॉर्मवरून या उपक्रमाकरिता नोंदणी घेण्यात आली. याला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. त्यातून ७५ लोकांची निवड करण्यात आली. ही सगळी मंडळी रविवारी आपली सगळी कामे बाजूला सारून एका वेगळ्याच ऐतिहासिक सहलीला निघालेत. हेरिटेज वॉकची सुरुवात टिळक पुतळ्यापासून झाली. पुढे गांधी गेट, रुक्मिणी टेम्पल कॉम्प्लेक्स, देशमुख वाडा, सिनिअर भोसले वाडा, बाकाबाईचा वाडा, गोंडवाना गेट, कोतवाली, ओल्ड लायब्ररी बिल्डिंग आणि सगळ्यात शेवटी चिटणवीस वाडा या हेरिटेज साईटला त्यांनी भेटी दिल्या. या मोडकळीस आलेल्या वास्तूंच्या अवस्थेचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. सहलीचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित केला असला तरी, शहराच्या ऐतिहासिक वारसा खऱ्या अर्थाने तरुणाईला दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे या माध्यमातून या ऐतिहासिक वारसा याचे जतन व्हावे, त्यामागचा प्रयत्न होता. नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा या वॉकच्या माध्यमातून अनेकांना माहीत पडला. त्यांच्या ज्ञानात भर पडली. किमान प्रशासनाचे लक्ष वेधले जाईलजर अशा वॉक नियमित आयोजित करण्यात आल्या, तर बऱ्याच हेरिटेज साईट्सकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. या वास्तूंच्या सौंदर्यीकरणाचे तसेच देखभालीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.मंदार पांढरे, समन्वयक, ‘द गुडविल ट्राईब’
ऐतिहासिक वारसाच्या शोधात तरुणाई नागपुरातील महाल येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:06 PM
शहराचे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे अवलोकन केले.
ठळक मुद्दे७५ तरुण-तरुणींचा हेरिटेज वॉक : दुरवस्थेत पडलेल्या वास्तूंचे केले अवलोकन