शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

By admin | Published: January 13, 2015 1:01 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक

नागपूर विद्यापीठ : ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांकडून मागवले अर्जनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही जाहिरात निघाल्यामुळे विद्यापीठ वर्तुळातील राजकारणाला अचानकपणे वेग आला आहे.डॉ.विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ.विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ.विनायक देशपांडे यांना देण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे विद्यापीठाचे लक्ष लागले होते. मुंबई येथे समितीचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली. यात झालेल्या चर्चेनंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहेत. याकरिता अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.सुभाष टाले यांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांच्या ‘व्हिजन’वर लक्षडिसेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समितीची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास एस.सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे व वर्धा येथील राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ.प्रफुल्लकुमार काळे यांचा समावेश आहे. कुलगुरूंची निवड करताना संबंधित उमेदवारांचे आवश्यक अर्हता, कौशल्य, अनुभव या बाबी तर विचारात घेतल्या जाणारच आहे; पण शिवाय विद्यापीठासाठी त्यांचे पुढील ‘व्हिजन’ काय असणार आहे, यावरदेखील समितीचे लक्ष राहणार आहे.