लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर सहारा सिटी आणि व जामठा परिसरातील स्थानिक लोकांना वाघिण फिरताना पाहिल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी वन विभागाच्या चमूने या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.वन विभागाच्या चमूने सकाळी ९.३० ते दुपारी २.३० पर्यंत संपूर्ण परिसराची पाहणी केल्याचा दावा केला आहे. या परिसरात वाघिण वा अन्य वन्यप्राणी न दिसल्याची पुष्टी केली आहे. त्यानंतरही या परिसरात चार कॅमेरे लावण्यात आले आहेत. या परिसरातील काही नागरिक आताही वाघिण पाहिल्याचा दावा करीत आहेत. काही नागरिक वाघिणीला बछड्यांसोबत पाहिल्याचे सांगत आहेत.न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा सिटीमागे निर्माणाधीन बंगल्यांचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे निर्माणाधीन स्थळ निमर्नुष्य आहे. त्याच्या लगतच्या संपूर्ण परिसरात उंच झाडे वाढली आहेत. अशास्थितीत या परिसरात लोकांची ये-जा बंद आहे. या क्षेत्रामागे खापरी आणि मंगरुर हे वनक्षेत्र आहे. यामुळेच प्रारंभी वन अधिकाऱ्यांनी या परिसरात वाघिण दिसल्याच्या दाव्याला फेटाळले नाही. परंतु मंगळवारी काही तासांच्या शोधमोहिमेनंतर वन विभागाने पत्र जारी करून व्हॉट्सअॅपवर व्हायरल वाघिणीचा व्हिडिओ सहारा सिटीच्या आसपासचा असल्याचा इन्कार केला आहे. या परिसरात कोणताही वन्यप्राणी प्रत्यक्ष दिसलेला नाही, अशी स्पष्टोक्ती दिली आहे.वन कर्मचाऱ्याचे घूमजावमंगळवारी शोध पथकासोबत फिरणाऱ्या एक वन कर्मचाऱ्याने या परिसरात ‘बिग कॅट’चे पगमार्ग असल्याचा दावा करून सर्वांना चकित केले होते. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला चूप राहण्यास सांगितल्यानंतर, त्यानेही या वृत्तावर घघूमजाव केल्याची चर्चा आहे.