शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
2
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
3
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
4
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
5
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
6
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
7
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
8
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
9
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
10
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
11
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
12
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
13
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
14
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
15
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
16
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
17
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
18
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
19
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
20
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

By योगेश पांडे | Published: September 01, 2024 7:20 PM

शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री साडेआठ ते एक या कालावधीत जागावाटपावर विस्तृत चर्चा करण्यात केली.

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या बोलणीला सुरुवात झाली असून दहा सप्टेंबरपर्यंत सर्व जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री साडेआठ ते एक या कालावधीत जागावाटपावर विस्तृत चर्चा करण्यात केली. दहा दिवसात संपूर्ण चर्चा अंतिम होईल. काही मुद्द्यांवर एकमत झाले आहे, तर काही मुद्दे बाकी आहे. दहा सप्टेंबरपर्यंत महायुतीचे जागा वाटपात एकमत होईल. बैठकीत कुठली आकडेवारी ठरली नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

- जो जागा जिंकू शकेल त्यालाच उमेदवारीशनिवारच्या बैठकीबाबत जागांच्या वाटपात विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येण्याबाबत एकमत झाल्याचे लोकमतने वृत्त दिले होते. जो जी जागा जिंकू शकेल त्या हिशेबानेच आम्ही महत्व देत आहे. उमेदवारांची क्षमता पाहून कोणत्या पक्षाला तिकीट जाईल हे निश्चित होणार आहे. सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येईल. केवळ विजय हेच उद्दीष्ट्य आहे. जागांचा आग्रह कोणत्याही पक्षाने धरलेला नाही. वेळ पडली तर एक पाऊल मागे घेण्याचीदेखील तयारी असेल. विशेष म्हणजे एनडीएमधील इतर पक्षांचादेखील विचार करण्यात येईल. दहा सप्टेंबरनंतर महायुतीचे नेतेच जागावाटप जाहीर करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

- वायफळ वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई

शनिवारच्या बैठकीत वाचाळवीरांबाबतदेखील सखोल चर्चा झाली. यानंतर कोणीही महायुतीच्या घटक पक्षांबाबत काहीही विरोधाभास निर्माण करणारा बोलघेवडेपणा करू नये. कोणीही महायुतीबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. कुणी याचा भंग केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भाजप पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

- विदर्भाच्या विकासकामांबाबतदेखील चर्चामहायुतीच्या बैठकीत सुमारे तासभर नागपूर अधिवेशनात विदर्भात मांडण्यात आलेले विकासकामांचे मुद्दे व सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात आला. रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस