लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी लसीकरणाचा दुसरा डोस दिला जाईल. शासनाने या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लस उपलब्ध केली आहे. मनपाच्या सर्व ९६ केंद्रांवर लसीकरण केले जाईल. पुढील आदेशापर्यंत फक्त दुसरा डोस नागरिकांना दिला जाईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. आंबेडकर रुग्णालय, इंदोरा व स्व. प्रभाकर दटके महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध आहे. अन्य केंद्रांवर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जात आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.