शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

पहिल्या पतीला घटस्फोट न दिल्याने दुसरे लग्न अवैध

By admin | Published: April 10, 2017 3:59 AM

हयात असलेल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याविना संबंधित महिला दुसरे लग्न करू शकत नाही

नागपूर : हयात असलेल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याविना संबंधित महिला दुसरे लग्न करू शकत नाही. ही बाब डावलून केलेले दुसरे लग्न अवैध ठरते, असा निर्णय नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.शालिनी व धनराज या दोघांचेही पहिले लग्न झाले होते. धनराजने पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट देऊन १७ फेब्रुवारी २०१३ रोजी शालिनीशी लग्न केले होते. लग्नापूर्वी त्याने शालिनी व तिच्या कुटुंबीयांना पहिल्या लग्नाची माहितीही दिली होती. परंतु शालिनीने पहिले लग्न लपवले होते, तसेच पहिल्या पतीला कायदेशीररीत्या घटस्फोटही दिला नव्हता. धनराजशी लग्न केल्यानंतर शालिनी काही दिवस चांगली राहिली. त्यानंतर तिने क्षुल्लक कारणांवरून भांडणे सुरू केली. तिला धनराजसोबत राहायचे नव्हते. त्यामुळे धनराजने तिला जून २०१३ मध्ये माहेरी सोडून दिले. दरम्यान, धनराजला शालिनीचे आधीच लग्न झाले असल्याचे, तिला एक मुलगा असल्याचे आणि तिने पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट घेतला नसल्याचे कळले. परिणामी धनराजने लग्न अवैध ठरविण्यासाठी, तर शालिनीने विवाहाधिकार मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० मे २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने धनराजची याचिका मंजूर केली, तर शालिनीची याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध शालिनीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. (प्रतिनिधी)दावा सिद्ध करण्यास अपयश१०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर फारकतनामा लिहून पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याचे व संबंधित समाजात ही प्रथा असल्याचे शालिनीचे म्हणणे होते. मात्र तिला हा दावा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे कुटुंब न्यायालयाने तिचे धनराजसोबतचे लग्न अवैध ठरविले होते.  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनीही हा निर्णय योग्य ठरविला.