शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नागपुरात दुसरी धावपट्टी दुसऱ्या टप्प्यात बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:59 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणाच्या नऊ वर्षांनंतर खासगी भागीदाराची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीएमआर कंपनी खासगी भागीदारीच्या गुंतवणुकीत प्राथमिकता

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणाच्या नऊ वर्षांनंतर खासगी भागीदाराची घोषणा करण्यात आली आहे. आता भागीदार गुंतवणुकीची प्राथमिकता ठरवीत असून, त्या अंतर्गत आता पहिल्याऐवजी दुसऱ्या टप्प्यात दुसरी धावपट्टी तयार होणार आहे.दुसरी धावपट्टी पहिल्या टप्प्यात का तयार होणार नाही, यावर अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला नाही. पण पहिल्या धावपट्टीलगत असलेल्या उंच इमारतींमुळे उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे कंपनीने दुसऱ्या धावपट्टीचे बांधकाम दुसऱ्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दुसरी धावपट्टी चार हजार मीटर लांब राहणार असून, जगातील सर्वात मोठे प्रवासाी विमान एअरबस-३८० उतरू शकेल, अशी धावपट्टी क्षमता राहील.वर्धा रोड आणि जयताळा या मार्गाकडे असलेली पहिली धावपट्टी ३२०० मीटर लांब आहे. पण या मार्गावर निर्मित दोन उंच इमारतींमुळे धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या इमारतींना मिहान इंडिया लिमिटेडने नोटीस बजावून मंजुरी रद्द केली होती. एअरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षणानंतरही दोन्ही इमारतींच्या उंचीबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नवीन टर्मिनल इमारतीला प्राथमिकतापहिल्या टप्प्यात ६४ हजार मीटर क्षेत्रफळ जागेत (६४ हेक्टर) नवीन टर्मिनल इमारत उभी राहणार आहे. कमी वेळेत जास्त महसूल मिळविण्यासाठी कंपनीने प्राधान्य दिले आहे. जीएमआर कंपनीकडे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विमानळाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मिहान इंडिया लिमिटेड संचालकांच्या बैठकीत १४.४९ टक्के महसूल वितरणावर जीएमआरला नागपूर विमानतळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. एएआयने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. एएआय पूर्वीच्या ५.७६ टक्के महसूल वितरणावर संतुष्ट नव्हता.

टॅग्स :Airportविमानतळ