शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

माध्यमिक शिक्षणाधिकारी काटोलकर यांची चौकशी; निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत दिशाभूल केल्याचा ठपका

By कमलेश वानखेडे | Published: June 24, 2023 5:16 PM

शिक्षणविभागाचे आदेश : सुधाकर अडबाले यांनी केली होती तक्रार

नागपूर : ऑनलाइन वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत पात्र शिक्षकांची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत नागपूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता पात्र शिक्षकांचे नाव नोंदणी करण्याबाबत कार्यक्रम २६ मे २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, शासन निर्णय निर्गमित व्हायच्या आधीच नागपूर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर यांनी १९ मे रोजी शिक्षकांच्या नावनोंदणीकरिता पत्र निर्गमित केले होते. काटोलकर यांच्या पत्रामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची दिशाभूल केली, असे पत्र २९ मे रोजी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दिले होते.आ. अडबाले यांच्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी काटोलकर यांची चौकशी करण्याचे आदेश २२ जून रोजी शिक्षण विभागाने काढले आहेत. राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशी समिती देणार १५ दिवसात अहवाल

- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरचे विभागीय अध्यक्षांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. विभागीय अध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करावी आणि त्या समितीमार्फत चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

--

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूर