नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी ०२७८७/०२७८८ सिकंदराबाद-दानापूर-सिकंदराबाद सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी दररोज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२७८७ सिकंदराबाद-दानापूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ३१ मार्चपर्यंत दररोज सिकंदराबादवरून सकाळी ६.१५ वाजता सुटून दानापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूरला दुपारी २.४० वाजता येऊन २.४५ वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२७८८ दानापूर-सिकंदराबाद सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी २ एप्रिलपर्यंत दानापूरवरून सकाळी ११ वाजता सुटून सिकंदराबादला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५५ वाजता पोहोचून ९ वाजता रवाना होईल. या गाडीचे प्रवासभाडे पूर्वीपेक्षा १.३ पट अधिक राहील. दोन्ही गाड्यांना बल्लारशाह, नागपूर, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांमध्ये १२ तृतीय वातानुकूलित, ४ स्लिपर आणि १ पार्सल व्हॅन राहील. दोन्ही गाड्यांचे बुकिंग गाडी सुटण्याच्या १० दिवसांपूर्वी होईल. या गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवाशीच प्रवास करू शकणार असून त्यांना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
.............