शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:52 AM

हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले.

ठळक मुद्देविविध उपक्रम राबविणार : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे मनोगत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले.आतापर्यंत राज्य कारागृह प्रशासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक, डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली आहे. नागपुरात त्यांनी अनेक वर्षे विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे नागपुरातील गुन्हेगारी आणि सामाजिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांचे येथे प्रशस्त नेटवर्क आहे. परिणामी डॉ. उपाध्याय यांची येथे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्याचे समजल्यापासून समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी डॉ. उपाध्याय यांची लोकमत प्रतिनिधीने भेट घेतली असता त्यांनी नागपूरबाबत आपल्या कल्पनांचा सारांश मांडला. सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना आहे. त्यासाठी गुन्हेगारी नियंत्रण आणि दहशतमुक्त नागपूरकर हा उपक्रम आपण राबविणार आहोत. सर्वच कल्पना सांगणे योग्य होणार नाही. मात्र, हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले. गुन्हेगारी नियंत्रण करून नागपूरला सुरक्षित शहर बनविण्याचे आव्हान केवळ एकटे पोलीस करू शकणार नाही. त्यासाठी नागरिकांची साथ हवी आहे. पोलिसांबद्दल जोपर्यंत आत्मीयता, आपुलकी वाटणार नाही, तोपर्यंत नागरिक पोलिसांना सहकार्य करणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम नागपूरकरांची आपल्याला मने जिंकायची आहेत. नागरिकांचा विश्वास जिंकल्यास ते पोलिसांची मदत करणार, अवैध धंदे, गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती देणार. त्यांच्या माहितीतूनच गुन्हेगारांना त्यांच्या जागी म्हणजेच, कारागृहात डांबण्याची किमया आम्ही (पोलीस) साधू अन् गुन्हेगार कारागृहात पोहचल्यास किंवा नागपूरबाहेर पळाल्यास नागपूर सुरक्षित शहर बनेल, असा सारांश त्यांनी मांडला.पुन्हा मिशन मृत्युंजय !डॉ. उपाध्याय नागपुरात गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी १० वर्षांपूर्वी येथे मिशन मृत्युंजय हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी नागरिकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना सतर्कतेचे धडे दिले होते. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सतर्कता कशी बाळगायची, कुठे काही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांची कशी मदत घ्यायची, त्याबाबत मार्गदर्शन, समुपदेशन केले होते. या उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख विद्यार्थी आणि नागरिक पोलिसांशी जोडले गेले होते. त्यामुळे या उपक्रमाची राज्यभर प्रशंसा झाली होती. उपाध्याय यांची नंतर येथून बदली झाली अन् हा उपक्रमही बंद पडला. आता नव्या स्वरूपात ‘मिशन मृत्युंजय’सारखा उपक्रम सुरू करायचा आहे, असा मानसही डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयcommissionerआयुक्त