शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीत चोख सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:34 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विधानभवनासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विधानभवनासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.वाहतूक शाखेतील ५० पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण दोन हजार पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. प्रजासत्ताकदिनी दहशतवादी उपद्रव करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने यापूर्वीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात महत्त्वाच्या तसेच संवदेनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, विधानभवन, संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, सीताबर्डी किल्ला, कस्तूरचंद पार्क, विविध मॉल्स आणि बाजारपेठेत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी विविध बॉम्ब शोधक व नाशक पथक शोधाशोध करीत आहेत.प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आवश्यक त्या ठिकाणी सशस्त्र जवानांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. अतिशीघ्र कृती दलाच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सायंकाळपासूनच शहरात गस्त वाढवण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.आयुक्तांकडून शुभेच्छा!पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम साजरे करताना कोणतीही संशयित वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही डॉ. उपाध्याय यांनी केले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनPoliceपोलिस