शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:42 PM

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी लागले आहे. पण कोरोनामुळे भीतीचे सावट ग्रामीण भागात पसरले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शहरात, तालुक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था ‘आत्मा’अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. हे शेतकरी गट सध्या कृषी विभागाला तसेच प्रशासनाला साहाय्य करीत आहे. कोरोनाची भीती शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण जनतेने गावाचे रस्तेसुद्धा बंद केले आहेत. बाहेरून कुणी गावात येऊ नये आणि गावातील कुणी बाहेर जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सुरू केले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी शहरात अथवा तालुक्यात जाऊन कृषी केंद्रातून ही खरेदी करायची आहे. दरम्यान, शेती साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये, असा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याकरिता नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यात एकूण २०१ गटांनी नोंदणी केलेली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी नोंदवायची आहे. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन आवश्यक आणि योग्य दरामध्ये कृषी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गटाने खरेदी केलेले साहित्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात येत आहे.त्यापैकी १७७ शेतकरी गटांकडे ३,१४२ शेतकऱ्यांनी ७००४ मेट्रिक टन खतपुरवठा करण्याकरिता मागणी नोंदवलेली आहे. आतापर्यंत २५ शेतकरी गटांनी ४०४ शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ३९९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे.गटाकडे मागणी नोंदणी केल्यानंतर आम्ही कृषी केंद्राशी चर्चा घडवून आणतो. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केली जाते. यामुळे गर्दी टाळता येते. वेळेत आणि पाहिजे तो माल मिळतो. शिवाय वाहतुकीचा खर्च कमी येतो.संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी