नागपूर : घरी कुणीच नसल्याचे पाहून अज्ञात आरोपीने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळविल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमी ले-आऊट समतानगर येथे ३ जुलैच्या सायंकाळी ६ ते ४ जुलैच्या सकाळी ११.३० दरम्यान घडली. राहुल वासुदेव सहारे (३५) रा. प्लॉट नं. १४५, भूमी ले-आऊट, समतानगर, गल्ली नं. १६ हे आपल्या घराला कुलूप लावून रामटेकला गेले होते. अज्ञात आरोपीने मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्याने लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ३ हजार रुपये असा एकूण १ लाख ३७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पळविला. सहारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत फ्लॅट नं. २०२, कम्फोर्ट होम, नरेंद्रनगर येथील रहिवासी संजयकुमार ब्रजोबंधू पारिख (३६) हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह लग्नसमारंभासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ३० हजार रुपये असा एकूण २ लाख ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...........