लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आहे.तयार होणार चार मार्गाचा पूलरिच-२ मार्गावरील पिलरवर क्रेनच्या साहाय्याने पहिले सेगमेंट नुकतेच बसविण्यात आले. यावेळी रिच-२ चे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. रिच-२ मार्गावर लागणारे सेगमेंट हिंगणा कास्टिंग यार्डात तयार करण्यात येत आहेत. कंटेनरच्या मदतीने कार्यस्थळी पोहोचविण्यात येत आहेत. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते आॅटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनपर्यंत रिच-२ चे कार्य होणार आहे. ७.३ कि.मी.च्या या मार्गावर एकूण सहा स्टेशनची उभारणी होणार आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे. कामठी मार्गावर वाहतुकीची मोठी गर्दी पाहायला मिळते. गड्डीगोदाम येथील गुरुद्वारासमोरील महामार्गावर रेल्वे पूल असून या पुलावर महामार्गाच्या समांतर दिशेने अतिरिक्त दोन थरांचा पूल तयार करण्यात येणार आहे. पुलाच्या सर्वात वरच्या थरावर मेट्रोचे ट्रॅक राहतील. त्यामुळे सध्याचा कामठी मार्ग, त्यावर रेल्वे पूल आणि महामेट्रोतर्फे तयार करण्यात येणारा दोन थरांचा अतिरिक्त पूल अशा एकूण चार मार्गाचा भव्य पूल येथे पाहायला मिळणार आहे. कामठी मार्गावर वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहनांना योग्य दिशेने वळविण्यासाठी ट्राफिक मार्शल दिवस-रात्र कार्य करीत आहेत. याप्रकारे वाहतुकीचे व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य सुरळीत पूर्ण केल्या जात आहे.
नागपुरात मेट्रो रिच-२ मध्ये बसविण्यात येत आहेत सेगमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:03 AM
कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आहे.
ठळक मुद्दे पिलरवर सेगमेंट : वाहतूक कोंडीवर पर्याय