दोन आरोपींना अटक : लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ््या कारवाईत २४, ६४० रुपये किमतीच्या दारूच्या ४४० बॉटल्स जप्त करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा, डी. के. पाटील यांना रेल्वेगाडी क्रमांक १२९६८ जयपूर एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची सूचना मिळाली. त्याने ही माहिती निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, सहायक उपनिरीक्षक आर. के. त्रिपाठी, विकास शर्मा, विवेक कनोजिया यांची चमू गठित केली. चमूने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जयपूर एक्स्प्रेसची तपासणी केली असता एस १० कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. त्याने आपले नाव रमेश तुलसीराम जाट (३५) रा. करोंधा नाला, खेरी, जि. जबलपूर असे सांगितले. त्याच्या जवळ दोन प्लॉस्टिकच्या पिशवीत दारूच्या २१ हजार रुपये किमतीच्या ३०० बॉटल्स होत्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. दुसऱ्या घटनेत लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक खुशाल शेंडगे, चंद्रशेखर मदनकर, प्रवीण भिमटे, संतोष निंभोरकर हे गस्त घालत असताना त्यांना रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचमध्ये राजू भाऊराव देवगडे (३२) रा. सपना टॉकीज, तारा लॉनजवळ, चंद्रपूर याचे जवळ एका पांढऱ्या रंगाच्या थैलीत दारूच्या ३,६४० रुपये किमतीच्या १४० बॉटल्स आढळल्या. त्यास अटक करून मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वेस्थानकावर दारूच्या बॉटल्स जप्त
By admin | Published: June 20, 2017 2:05 AM