लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलिसांनी सावनेर- पांढुर्णा मार्गावरील रामपुरी फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी वाहन आणि तंबाखू असा एकूण ८३ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
किशाेर विठाेबा कुथे (५०, रा. ढाेमणे लेआऊट, सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. केळवद पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून सावनेरच्या दिशेने सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी सावनेर- पांढुर्णा मार्गावरील रामपुरी फाटा परिसरात वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यांनी संशयाच्या बळावर एमएच- ४० सीबी- ७६३४ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने येत असलेल्या किशाेर कुथे याला थांबवून झडती घेतली. यात त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये पाेलिसांना सुगंधित तंबाखूची पाकिटे आढळून आली. त्या तंबाखूच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी असल्याने पाेलिसांनी त्याला लगेच अटक केली. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा आणि १३,८४० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू असा एकूण ८३ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड, रवींद्र चटप, सचिन येलकर, गुणवंता डाखाेळे यांच्या पथकाने केली.