लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या कलाकारांची निर्मिती असलेल्या 'मसीहा' या हिंदी नाटकाची इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) च्या राष्ट्रीय प्लॅटिनम जुबिली महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. इप्टातर्फे निवड होणारे नागपुरातील हे एकमेव नाटक आहे.'मसीहा' या चर्चित नाटकाचे लेखन शैलेश नरवाडे यांनी केले असून याचे दिग्दर्शन रूपेश पवार यांनी केले आहे. इप्टाच्या प्रतिष्ठित महोत्सवासाठी या नाटकाची निवड होणे ही नागपूर शहरासाठी एक अभिमानाची बाब आहे कारण भारताच्या अनेक राज्यांतून निवडलेल्या १८ नाटकांपैकी हे एक नाटक आहे.इप्टाच्या स्थापनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली आहे आणि त्या अनुषंगाने या राष्ट्रीय प्लॅटिनम जुबिली महोत्सवाचे आयोजन पाटणा येथे करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २७ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सईद मिर्झा, संजय मिश्रा, अखिलेन्द्र मिश्रा, प्रकाश राज, संभाजी भगत आणि चंदन मित्रासारखे अनेक दिग्गज कलाकार आपली हजेरी लावणार आहेत.'मसीहा' एक धाडसी आणि खूप प्रभावशाली नाटक आहे ज्याची तुलना नावाजलेल्या नाटकांशी केली जात आहे. ‘‘राजा देवमुकुट एका राज्यावर आक्रमण करून तिथे आपले शासन स्थापित करतो आणि बळीराज आणि महिसा या दोन तरुणांना आपल्या सैन्यात नोकरी देतो. राजाची नोकरी करता-करता त्या दोन मित्रांना लक्षात येतं की ते दोघं आता फक्त गुलाम आहेत. त्या दोन मित्रांचा शेतकरी ते सैनिक आणि मग विद्रोही बनण्याचा प्रवास या नाटकात खूप रोमांचक पद्धतीने आणि संगीताच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. यातील सर्व कलावंत हे नागपुरातील आहेत.'मसीहा' चे लेखक शैलेश नरवाडे हे फिल्ममेकर आणि नाटककार आहेत. त्यांनी 'रूममेट्स' हा मराठी चित्रपट बनवलेला आहे. रूपेश पवार हे नागपूरच्या रंगमंचावर एक ओळखीचे नाव आहे. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या अनेक नाटकांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.नागपूरकरांसाठी खास प्रयोगधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांसाठी या नाटकाचे खास प्रयोग १८ आणि १९ आॅक्टोबर २०१८ रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहेत.
‘इप्टा’च्या राष्ट्रीय महोत्सवासाठी 'मसीहा' नाटकाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:03 AM
नागपूरच्या कलाकारांची निर्मिती असलेल्या 'मसीहा' या हिंदी नाटकाची इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) च्या राष्ट्रीय प्लॅटिनम जुबिली महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. इप्टातर्फे निवड होणारे नागपुरातील हे एकमेव नाटक आहे.
ठळक मुद्देनागपूरच्या कलावंतांची उंच भरारी : देशभरातील १८ नाटकांची निवड