लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.नागपूर जिल्ह्यात ६८० शाळांमध्ये आरटीईची प्रक्रिया राबविण्यात आली. २५ टक्के आरक्षणानुसार ६७८४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यासाठी ३१०४४ पालकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. आरटीईच्या लॉटरीमध्ये यापैकी ६६८५ बालकांची निवड झाली. अजूनही ६५०० वर बालके निवडीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याचा आरटीईच्या लॉटरीमध्ये प्रवीण सुपर फाईन कॉन्व्हेंट, गरोबा मैदान, निलकंठराव काळे कॉन्व्हेंट, श्रीकृष्णनगर व स्वामी नारायण स्कूल, पूर्व वर्धमाननगर या तीनही शाळेत त्याची निवड झाली. विशेष म्हणजे या बालकाच्या पालकाने आरटीईत अर्ज करताना वेगवेगळ्या जन्मतारखा टाकल्या होत्या. पण त्याचे नाव, पत्ता व इतर सर्व आवश्यक दस्तावेज सारखेच होते. पण आरटीईच्या प्रक्रियेत त्याचे तीनही शाळेत निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आरटीई अॅक्शन कमिटीकडे निवड झालेल्या बालकांचा संपूर्ण डाटाबेस आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे उघडकीस आल्यानंतर, त्याच्या पालकाने क्षमापत्र देऊन मुलाचे प्रवेश आरटीईतून रद्द केले आहे.निव्वळ जन्मतारखेचाच घोळ नाही, तर अनेक पालकांनी उत्पन्नाचा दाखला, घरभाड्याचे करारनामे बोगस दिले आहे. अंतराचा घोळसुद्धा कायम आहे. अशा अनेक प्रकारच्या बोगसगिरी पुढे येत असून, आरटीईच्या निवडप्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे. हा प्रकार तर निवड करतानाच लक्षात येण्यासारखा आहे.मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अॅक्शन कमिटी
आरटीईत एकाच विद्यार्थ्याची ३ शाळांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:47 PM
आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देआरटीई अॅक्शन कमिटीच्या माध्यमातून प्रक्रियेतील बोगसपणा उघड