नागपूर : नोकरीचे आमिष देऊ न तरुणींची परप्रांतात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन महिला सदस्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यात गुड्डुी ऊर्फ मनिषा मजबूतसिंग यादव(४०) रा. नंदनवन, वैरागडे हॉस्पिटलजवळ व स्वाती सुनील कावटे (३२)रा. श्रीवासनगर, कोराडी यांचा समावेश आहे. आरोपींनी एका पीडित तरुणीला नोकरीचे आमिष देऊ न तिची राजस्थानात विक्री केली होती. तरुणीने तिचे लग्न जुळलेल्या भावी पतीला फोन करून या घटनेची माहिती दिली. तीन लाख देऊ न यातून सुटका करण्यास सांगितले होते. त्याने गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्याकडे या संदर्भात तक्रार नोंदविली. मासिरकर यांच्या निर्देशावरून सामाजिक विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी प्रथम गुड्डीला अटक केली. तिने गरीब व नोकरीची गरज असलेल्या तरुणींना लग्नाचे आमिष देऊ न विकल्याची कबुली दिली. या टोळीची सूत्रधार स्वाती असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी स्वातीलाही अटक केली. या टोळीत पंकज नामक युवकासह इतरांचाही समावेश आहे. एखादी तरुणी जाळ्यात अडकल्यानंतर तिला इंदूर येथे घेऊ न जायचे तेथे बबिता सिंग या दलालाच्या स्वाधीन केले जात होते. बबिता पीडित तरुणींची राजस्थानात विक्री करीत होती. ग्राहकांनुसार तरुणींची किंमत ठरत होती. राजस्थानात लग्नासाठी तरुणी मिळत नसल्याने अशा तरुणींची खरेदी करणारे ग्राहक सहज मिळतात. ज्या युवकाने तरुणीची खरेदी केली त्याची आई वृद्ध आहे. घरकाम व आईची देखभाल करण्यासाठी त्याला तरुणीची गरज होती. उपायुक्त रंजन शर्मा, दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
नोकरीचे आमिष देऊ न तरुणीची राजस्थानात विक्री
By admin | Published: February 04, 2016 2:55 AM