लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : जवळी (ता. भिवापूर) प्राथमिक आराेग्य केंद्रातर्गत येेणााऱ्या गावांमधील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेत असून, त्यांचा आता दुसरा डाेस घेण्याचा काळा आल्याने ते प्राथमिक आराेग्य केंद्रात जात आहेत. मात्र, अनेकांना दुसरा डाेस देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, नाेंदणी हाेत असल्याने ही समस्या उद्भवली असून, टाळाटाळ केली जात नसल्याचे आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आराेग्य केंद्रात रविवारी (दि. १६) दुसरा डाेस घेण्यासाठी आलेल्या पाच गावांमधील ३० नागरिकांच्या पदरी निराशा पडल्याने त्यांना परत जावे लागले.
अंदाजे दीड महिन्यापूर्वी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डाेससाठी ४५ दिवसांनी बाेलावले हाेते. त्याअनुषंगाने हत्तीबोडी, झिलबोडी, मेढा, पाहमी व चिचाळा येथील ३० ज्येष्ठ नागरिक रविवारी जवळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आले हाेते. यात ६० वर्षावरील २० जण हाेते. विशेष म्हणजे, हे सर्व जण १२ ते १६ किमीवरून आले हाेते. परंतु, त्यांना लसीचा दुसरा डाेस देण्यास नकार देण्यात आला. या वृद्धांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र, त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ मिळाला नाही. आपण रखरखत्या उन्हात प्रत्येकी १०० रुपये खर्च करून आलाे. दुसरा डाेस द्यायचा नव्हता तर आम्हाला बाेलावले कशासाठी. गावात लस मिळणार नाही. आम्हाला वारंवार येणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, अशा प्रतिक्रियाही या वृद्धांनी व्यक्त केल्या.
...
नाेंदणीचा घाेळ
हत्तीबाेडी येथील वृद्ध महिलेच्या विनंतीवरून आराेग्य सेविका संगीता माेहाेड यांनी संगणक परिचालकास त्या वृद्धांची नाेंदणी करण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी संकेतस्थळावर नाेंदणी हाेत नसल्याने त्यांना लस द्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्याचे संगीता माेहाेड यांनी सांगितले. नाेंदणीविना लस देणे शक्य असते तर आपण सर्वांना प्राधान्याने लस दिली असती, अशी प्रतिक्रयादेखील त्यांनी व्यक्त केली.