लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दुसऱ्या सत्रात खा. डॉ. विकास महात्मे, खा. रामदास तडस, माजी खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. चरण वाघमारे मार्गदर्शन करतील. अॅड. अविनाश तेलंग हे ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेले कायदे आणि त्यावरील अंमलबजावणी यावर चर्चा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक अनुप जलोटा यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होईल.संमेलनानंतर ही समिती कायमस्वरुपी कार्य करेल. त्यासाठी कार्यालय सुरू करण्यात येईल. एक कोटीचा निधी जमा करून त्यातून मिळणाºया व्याजातून ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून केला जाईल, असेही दत्ता मेघे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, गिरीश गांधी, बाळ कुळकर्णी, रत्नाकर राऊत, डॉ. राजू मिश्रा, मेहमूद अंसारी, बबनराव वानखेडे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचे रविवारी नागपुरात विशाल संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:48 AM
ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देदिवसभर चर्चासत्र : मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप