लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शर्मिली नामक वाघिणीचे शव मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. सिवनीतील वनाधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन सीसीएफ कल्याण कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एक पथक तपासासाठी सिवनीला पाठविण्याचे आदेश दिले आहेत.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील या प्रकरणाचा तपास सिवनी जिल्ह्यातील वनाधिकारी करत आहेत. या घटनेतील एक आरोपी महाराष्ट्र वन विभागातील सुरक्षा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पथकाच्या तपासाची दिशा त्याच्याकडे वळली आहे. करवयी येथील धामसिंह खंडाते याने दिलेल्या बयानासुसार, १० डिसेंबरला त्याने डिप्टी रेंजर खान यांच्या सांगण्यावरून या वाघिणीचे शव बैलगाडीवर लादूून खवासा येथे आणले व फेकून दिले होते. त्यानंतर ११ डिसेंबरला या वाघिणीचे शव मध्यप्रदेशातील खवासा बिटात मिळाले होते. तिचे सर्व अवयव सुरक्षित असल्याने विभागीय तपासणीला वेग आला होता.या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मध्यप्रदेश वनविभागातील अधिकाऱ्यांकडून होत आहे. तपासातून सुटका व्हावी आणि विभागीय कारवाई टळावी यासाठी, महाराष्ट्राच्या हद्दीत मृत झालेल्या वाघिणीला मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशाच्या हद्दीत आणून फेकल्याचा आरोप होत आहे.सिवनी येथील सीसीएफ आर.एस. कोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सीसीएफसोबत त्यांनी चर्चा केली असून हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तेथून एक पथक तपासासाठी येणार असून आपली त्यांना सर्वतोपरी सहकार्याची तयारी राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
शर्मिलीच्या तपासासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ वनाधिकारी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 11:22 PM
शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे.
ठळक मुद्देसिवनीतील वाघिणीच्या मृत्यूचे प्रकरण : शव फेकले होते मध्यप्रदेशच्या सीमेत