नागपूर : आंबेडकरी चळवळचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते उमाकांत रामटेके (८३) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तीन मुले व मोठा आप्त परिवार आहे.रामटेके हे सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ. आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनपासूनच ते सक्रिय होते. दीक्षाभूमी येथील ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या सोहळ्यातही त्यांचा सहभाग होता. १९५९ मध्ये भूमिहीनांच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता.
ज्येष्ठ रिपाइं नेते उमाकांत रामटेके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:14 AM