बॉम्बची अफवा : दक्षिण एक्स्प्रेसमधून उतरविली बॅगनागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमध्ये एक भली मोठी बॅग बेवारस अवस्थेत होती. यामुळे या बॅगमध्ये बॉम्ब असू शकतो या शंकेने गाडीतील प्रवासी घाबरले. त्यांनी आरपीएफला याबाबत सूचना दिली. गाडी नागपुरात येताच ही बॅग खाली उतरवून आधी श्वानपथकाद्वारे आणि नंतर बॅग स्कॅनरमध्ये तपासली. परंतु त्यात एका हायड्रो ड्रील मशीन आढळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये एक मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बॅग बेवारस स्थितीत पडून होती. बराच वेळ होऊनही या बॅगचा ताबा कोणीच न घेतल्यामुळे प्रवासी घाबरले. अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाला सूचना दिली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर दक्षिण एक्स्प्रेस येताच आरपीएफने ही बॅग खाली उतरविली. त्यानंतर उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, विकास शर्मा, विवेक कनोजिया यांनी श्वान रेक्सच्या साह्याने या बॅगची तपासणी केली. परंतु श्वानाने कोणताच धोक्याचा इशारा दिला नाही. त्यामुळे ही बॅग स्कॅनरमध्ये तपासली असता त्यात हायड्रो ड्रील मशीन आढळली. ही बॅग आरपीएफ ठाण्यात जमा करण्यात आली. (प्रतिनिधी)
बेवारस बॅगमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ
By admin | Published: April 25, 2017 2:04 AM